संघ प्रार्थनेचा अर्थ
हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबध्द झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही. असे शुध्द चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृध्दी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीत कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
।। भारत माता की जय ।।
शाळा
माझ्या शाळेचे नाव ‘ ' आहे .
माझ्या शाळेती सर्व शिक्षक प्रेमळ आहेत . ते छान शिकवतात .
आमच्या वाचनालयात खूप पुस्तके आहेत . मी तेथे खूप पुस्तके वाचली आहेत .
माझी शाळा आदर्श आहे .
माझी शाळा मला खूप आवडते .
मदर टेरेसा
मदर टेरेसा यांचा जन्म २७ ऑगष्ट १९१० रोजी युगोस्लाव्हिया देशातील ‘सकॉपये’या गावी झाला. वयाच्या १८ व्या वर्षी ऎन तारुण्यात उंबरठ्यावर असतानासर्व संगपरित्याग करून त्या मिशनरी बनल्या. ६ जानेवारी १९२९ रोजी त्या भारतात कोलकत्ता आल्या. लॉरेटो मिशनच्या ‘सेंट मेरी हायस्कूल’ मध्ये त्यांनी भूगोल शिकवण्यास सुरुवात केली.
* नंतर ‘ अमेरिकन मेडिकल मिशन’ मध्ये त्यांनी वैद्यकिय उपचार आणि परिचारिका यांचे प्राथमिक शिक्षण घेतले. मदर टेरेसा १९४८ साली कोलकत्ताच्या ‘मोतीझील’ या झोपडपट्टीत आपले सेवा कार्य सुरु केले. तेथे त्या रोगी,अपंग-अनाथांची, प्रेमाणे सेवा करू लागल्या. कोलकत्ता मध्ये कालिमातामंदिरातील धर्म शाळेत १९५२ साली त्यांनी ‘निर्मल हृद्य’हि संस्था प्रथम उघडली. १९५७ साली त्यांनी ‘महारोगी सेवा केंद्र’ सुरु केले. मदर तेरेसा म्हणजे चालती बोलती प्रेम मूर्ती ” होती. १९६२ साली भारत सरकारने यांना ‘पद्मश्री’ हि पदवी देऊन त्यांचा बहुमान केला.
१९७८ मध्ये त्याना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला.१९८० साली त्या ”भारतररत्न” झाल्या.
‘आदर्श’ म्हणून अशा व्यक्ती आपण सतत द्ल्यास्मोर ठेवून कार्य केले पाहिजे.
५ सप्टेबर १९९७ साली त्याचे निधन झाले.
More detailed essay is available in
http://www.marathi-unlimited.in/2013/02/essay-on-mother-teresa-for-school-students/
No comments:
Post a Comment