Thursday, June 5, 2014

Smt. Sumitra Mahajan - Lok Sabha Speaker - in Marathi

श्रीमती सुमित्रा जयंतराव महाजन


सार्वत्रिक निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी मध्य प्रदेशातील भाजपच्या खासदार सुमित्रा महाजन यांचे नाव निश्चित झाले आहे.

१२ एप्रिल १९४३ रोजी चिपळूण येथे सौ उषा आणि पुरुषोत्तम साठे याच्यापोटी जन्मलेली सुमन साठे याच आपल्या सुमित्राताई महाजन . जयंतराव महाजन यांचाशी विवाह झाल्यावर त्यांनी आपले एम. ए. , एल. एल. बीचे शिक्षण पूर्ण केले.

त्यांची राजकीय कारकीर्द थोडक्यात अशी. अनेक वर्षांपासून त्या इंदूरहून सतत लोकसभेवर निवडून जात आहेत. पहिल्यांदा 1989 मध्ये त्या जिंकल्या ते केंद्रीय गृहमंत्री प्रकाशचंद्र सेठी यांना पाडून, पण त्यानंतर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे तब्बल 20 वर्षे सलग आठ वेळा जिंकून येणारे आणि नेहमीच घरीदारी शुद्ध मराठी बोलणारे हे राजकीय व्यक्तिमत्त्व भारतात आगळेवेगळेच आहे. 

No comments:

Post a Comment