Sunday, October 2, 2016

Prime Minister of India - Narendra Modi - Marathi Biography - नरेंद्र मोदीजींचे चरित्र


नरेंद्र मोदीजींचे चरित्र

नरेंद्र मोदी यांचा जीवन

17 सप्टेंबर 1950 साली मोदींचा जन्म झाला. नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० चा आहे. त्यांची जन्मवेळ दुपारी १२. जन्मस्थळ गुजरातमधलं मेहसाणा इथलं वडनगर.

त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे.

नरेंद्र मोदी ७ ऑक्टोंबर २००१ पासून गुजरात राज्याचा मुख्यमंत्री आहे. मोदींच्या नेतातृत्वात २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधान सभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते. मोदी २००१ पासून मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते.  त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने उद्योगाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावली आहे. ज्योती ग्राम योजनेद्वारे विजेच्या संकटांवर मात करून राज्यातील सर्व नागरिकांना २४ तास वीज उपलब्ध केली आहे. राज्यातील प्रत्येकाचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील वाढीव निधी वाटप, आरोग्य, शिक्षण तसेच अन्नधान्य वितरण याबाबत मोहीम सदृश्य कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे यशस्वी करण्यासाठी त्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. पायाभूत तंत्रज्ञान, चिरंजीवी योजना, आपत्कालीन व्यवस्था आदि विभागांवर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञान ही राज्याच्या विकासाची गुरुकिल्ली असल्याचे मोदी यांनी प्रतिपादन केले आहे.

गोआ मध्ये झालेल्या भाजपा कार्यसमितिच्या बैठकीमध्ये नरेन्द्र मोदीना २०१४ लोकसभा निवडणूक  अभियान चे दायित्व देण्यात आले. आणि  दिल्लीतील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता  पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली. मोदी यांनी घणाघाती भाषणे आणि प्रचंड सभांचा धडाका लावला. आणि लोकसभा निवडणुकीत २८२ जागा जिंकत भाजपाने गेल्या ३० वर्षातील मोठा विजय प्राप्त केला.

मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली

ज्ञानशक्ती, ऊर्जाशक्ती, जनशक्ती, जलशक्ती, आणि रक्षाशक्ती हा त्यांच्या विकासाचा पंचमंत्र. लोकशाही व्यवस्थेत परिश्रमाला सन्मान प्राप्त करून देण्याचे त्यांचे ध्येय आहे. वक्तशीरपणा, ध्येयनिष्ठा, समर्पण ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. स्वामी विवेकानंद हे मोदींचे आदर्श आहेत.___________________

___________________
Being Marathi upload
17 Sep 2014


मोदींचा रोडशो
24 April 2014
___________________

___________________
Mi Marathi
7 May 2014


नरेंद्र मोदी ‘अतुल्य भारत’चे ब्रँड अम्बेसिडर ?
20/08/2016
http://www.tarunbharat.com/?p=402758

नरेंद्र मोदी इंटरनेट स्टार : टाइम
18/03/2016

‘नरेंद्र मोदी मोबाईल ऍप’ लाँच 
17/06/2015

Search query for Narendra Modi on Tarun Bharat.com
http://www.tarunbharat.com/?s=%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80+&paged=2


http://zeenews.india.com/marathi/news/india/narendra-modi-s-background/160541

http://www.marathi-unlimited.in/2013/09/gujarat-cm-narendra-modi/

http://www.mahabjp.org/Netritwa/Rashtric.aspx

No comments:

Post a Comment