Monday, March 27, 2017

Gudi Padwa in Marathi - गुढीपाडवा - गुढी पाडवा



गुढीपाडवा – शुभेच्छा








                                                       28.3.2017  - हिरानंदानी इस्टेट, ठाणे

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.  गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.

गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी परिधान करतात, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर (सहसा तांब्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे/कास्याचा) धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात.गुढी नंतर पाटावर उभी केली जाते.

तयार केलेले गुढी दारांत/उंच गच्चीवर/गॅलरीत लावातात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता लावतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून. उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात.

दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.

भगवा ध्वज लावूनही त्याचे आरोहण करून पूजन करावे असा संकेत  आहे.


या दिवशी

  रामाने वालीचा वध केला.
  राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
  शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
  या दिवसापासूनच `शालिवाहन शक’ सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

गुढीपाडव्यापासून, नवीन शालिवाहन शकवर्षारंभापासून नवीन पंचांगाची सुरुवात होते.

Wikipedia Pedia Page

http://m4marathi.com/v2/gudi-padwa-information-in-marathi/

http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-articles/gudi-padwa-mahatva/


"अधर्माचीं अवघी तोंडीं। दोषांचीं लिहिलीं फाडीं।
सज्जनांकरवीं गुडी। सुखाची उभवीं।।"
या ज्ञानेशोक्तिनुसार आपल्या जीवनामध्ये "अक्षय्य" ब्रह्मसुखाची सुखध्वजा (गुडी)उभी राहो!!!!!!!
_________________


 _________________


_________________

_________________

No comments:

Post a Comment