डॉ.बापू केंदुरकर यांचा संक्षिप्त परिचय
डॉ.मधुकर पुरुषोत्तम उपाख्य बापू केंदुरकर
पुण्याच्या एस.पी कॉलेज मधुन बापूंनी आपले शिक्षण पूर्ण केले. मराठी विषयात एम. ए. झाल्यानंतर "श्री म माटे यांचे सामाजिक विचार आणि साहित्य" या विषयावर त्यांनी पीएचडी केली.ठाणे कॉलेजात ते मराठीचे प्राध्यपक म्हणुन कार्यरत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते महाराष्ट्र प्रदेशाचे १९७० ते १९८८ या कालावधीत १९ वर्षे प्रांत प्रमुख होते, तर विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रचारकांचे ‘पालक’ म्हणून ५ वर्षे ते काळजी वाहत होते.
१९९० ते २००७ या कालावधीत रा.स्व. संघाचे मुलुंड भागाचे सहसंघचालक म्हणून त्यांनी कार्य केले. स्व. दत्तोपंत ठेंगडीजींच्या कार्यकर्ता, थर्ड वे व सामाजिक क्रांतीची वाटचाल व डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या पुस्तकांच्या लिखाणात त्यांचा सहभाग होता. सामाजिक व राष्ट्रीय समस्यांबाबत चिंतन करून चर्चासत्रे, टिपणे, लेख व पुस्तिका अशा विविध मार्गांनी डॉ. केंदुरकर प्रबोधन करीत राहिले.
एकात्म प्रबोध मंडळाचे सन २००० पासूनचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी ‘एकात्म मानव दर्शन’ या राष्ट्रीय तत्त्वज्ञानासबंधीच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचा पाया घातला.
डॉ.मधुकर पुरुषोत्तम उपाख्य बापू केंदुरकर यांचे दिनांक २६ नोव्हेंबर २०१२ रोजी ७९व्या वर्षी पुणे येथे दु:खद निधन झाले.
डॉ.बापू केंदुरकर स्मृति व्याख्यान, मुलुंड, मुंबई
एकात्म प्रबोध मंडळाचे प्रथमपासूनचे अध्यक्ष डॉ.बापू केंदुरकर यांचे दि. २६ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकात्म प्रबोध मंडळातर्फे सामाजिक विषयावर दरवर्षी एक व्याख्यान आयोजित केले जाते. हे व्याख्यान साधारणतः २६ नोव्हेंबरच्या आसपास मुलुंड येथे होते. आतापर्यंत झालेली व्य़ाख्याने व त्यांचे विषय
२०१३ - भारतीय समाजपरिवर्तनाच्या दिशा – वक्तेः मा. मधुभाई कुलकर्णी, रा.स्व.संघ केंद्रीय कार्यकारी मंडळ सदस्य
२०१४ - एकात्म मानव दर्शन व सामाजिक समरसता – वक्तेः श्री. रमेश पतंगे, अध्यक्ष-सामाजिक समरसता मंच, माजी संपादक-सा.विवेक
२०१५ - श्री.म.माटे यांचे सामाजिक विचार आजच्या संदर्भात - वक्तेः प्रा.म.मो.पेंडसे, कीर्ती कॉलेजमधून निवृत्त, सुप्रसिद्ध विचारवंत
2016 - भारतीय समाज – आव्हानें व उपाययोजना – वक्तेः डॉ. द.ना.धनागरे, माजी उपकुलगुरु, शिवाजी विद्यापीठ
No comments:
Post a Comment